esakal | पाटण पंचायत समितीचे काम अभिमानास्पद : गृहराज्यमंत्री देसाई
sakal

बोलून बातमी शोधा

satara

पाटण पंचायत समितीचे काम अभिमानास्पद : गृहराज्यमंत्री देसाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटण (सातारा) : पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. लोकांना हक्काचे घर देण्यात सरकारचा मोलाचा वाटा आहे. शासनाने दिलेल्या उद्दिष्टांपैकी ९३ टक्के उद्दिष्ट पाटण पंचायत समितीने पूर्ण केल्याने पंचायत समितीला चार पुरस्कार प्राप्त झाले, ही अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्‌गार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काढले.

येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महाआवास अभियान पुरस्कारांतर्गत प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीण, राज्य पुरस्कृत ग्रामीण आवाज योजना, तालुकास्तरीय सर्वोत्कृष्‍ट ग्रामपंचायत घरकुल व क्लस्टर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहायक गटविकास अधिकारी विजय विभूते, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, बबनराव कांबळे, पंजाबराव देसाई, संतोष गिरी, सीमा मोरे, सुभद्रा शिरवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: 798 आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या; साताऱ्यात उपोषण

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांचा यशात वाटा आहे. कोरोना, अतिवृष्टी, भूस्खलनाच्‍या अडचणीच्या काळातही अधिकाऱ्यांनी चांगले काम केले. त्याचे योग्य ते बक्षीसही मिळाले आहे. राज्यात पाटण पंचायत समितीचा चांगला नावलौकिक आहे. राज्यात आघाडी सरकार असल्याने सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी एकत्रितपणे चांगले काम करून तालुक्याला पुढे न्यावे. अर्थराज्यमंत्री या नात्याने विकासासाठी तो नक्कीच निधी देईन.’’ सभापती शेलार, गटविकास अधिकारी यांनी माहिती दिली. सहायक गटविकास अधिकारी विजय विभूते यांनी आभार मानले.

हेही वाचा: 'भारतासारख्या गरीब देशात 60 कोटी लसीचा टप्पा गाठला जाणार नाही'

...या ग्रामपंचायतींचा झाला सन्मान

महाआवास योजनेत प्रथम आलेल्या नाव ग्रामपंचायत, द्वितीय शिरळ व तृतीय ढाणकल ग्रामपंचायतींचा, राज्य पुरस्कृत रमाई योजनेत प्रथम गोठणे, द्वितीय ढाणकल, तृतीय कसणी ग्रामपंचायतींसह वैयक्‍तिक घरकुल योजनेत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या लाभार्थींचा व उल्लेखनीय काम केलेल्या ग्रामपंचायतींचा सन्मान मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

-जालिंदर सत्रे

loading image
go to top