Eknath Shinde : सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशावर नेऊन पर्यटनाचे हब बनविण्यासाठी शासन कटिबध्द

सातारा हा जगातील सर्वसंपन्न जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असुन महाबळेश्वर पर्यटनाचा कंठमनी आहे.
Eknath Shinde

Eknath Shinde

sakal

Updated on

कऱ्हाड - सातारा हा जगातील सर्वसंपन्न जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असुन महाबळेश्वर पर्यटनाचा कंठमनी आहे. जिल्ह्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशावर नेण्यासासाठी जिल्ह्याला पर्यटनाचे हब बनविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. त्यासाठी कोयना दौलत डोंगरी महोत्सवांतुन जनजागृती करता येईल. नवीन महाबेश्वरच्या माध्यमातुन ५५० गावातील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्याच गावात रोजगार मिळवून देण्यात येईल. मात्र कोणीही जमीनी विकु नका असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com