
-सिद्धार्थ लाटकर
सातारा : मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी पालक सजग झाले असून, ६८ हजार ७१८ नागरिकांनी केंद्र शासनाने टपाल विभागात (Postal Department) सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana) खाते उघडले आहे. हे आर्थिक वर्ष संपताना तब्बल २४ कोटी दोन लाख ८९ हजार १७२ रुपयांची बचत नागरिकांनी त्यांच्या मुलींच्या नावे जमा केली आहे.