
जिल्ह्यातील काही संवेदनशील ग्रामपंचायतींचा निकाल लागल्यानंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
खंडाळा (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ता. 15 जानेवारीला मतपेटीत बंद झाले. खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीत उमेदवारांपेक्षा मतदारांनी नाेटाला सर्वाधिक पसंती दिली आहे. सध्या येथील निकाल प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
खंडाळा तालुक्यातील 50 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीस सकाळी आठला प्रारंभ झाला. निवडणूक अधिकारी तहसीलदार दशरथ काळे, नायब तहसीलदार वैभव पवार व सौ. साळी यांच्या नियंत्रणाखाली 21 टेबल आहेत. प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी असे 63 कर्मचारी कार्यरत आहेत.
Gram Panchayat Results : शंभूराज देसाई गटाचे वर्चस्व; पाटणकरांची पिछेहाट
तालुक्यातील एकूण 698 उमदेवारांसाठी मतदान झाले हाेते. आज मतमोजणी सकाळी आठला येथील किसन वीर सभागृहात सुरू झाली. त्यासाठी सात फेऱ्या होणार आहे. त्या पुढीलप्रमाणे : पहिली फेरी- पाडेगाव, वाठार बुद्रुक, बोरी, सुखेड, मरिआईचीवाडी, लोणी, पिंपरी बुद्रुक. दुसरी फेरी- बावकलवाडी, पाडळी, निंबोडी, बाळूपाटलाचीवाडी, खेड बुद्रुक, अंदोरी, पिसाळवाडी व धनगरवाडी. तिसरी फेरी- कोपर्डे, नायगाव, तोंडल, शेखमिरेवाडी, गुठाळे, सांगवी, शेडगेवाडी, भाटघर, मिरजे, झगलवाडी व अंबारवाडी. चौथी फेरी- वडगाव, भोळी, राजेवाडी, वाघोशी, कवठे, अतिट व शिंदेवाडी. पाचवी फेरी- म्हावशी, कर्नवडी, लोहोम, धावडवाडी, भादे, विंग व केसुर्डी. सहावी फेरी- अजनूज, जवळे, भादवडे, मोर्वे, घाटदरे, शिवाजीनगर, पारगाव व कण्हेरी. सातवी फेरी- बावडा व अहिरे.
Gram Panchayat Results : क-हाड, फलटणला उमेदवारांचा आनंद पारावार; चिठ्ठीने जिंकविले
दरम्यान धनगरवाडी (ता. खंडाळा) येथे उमेदवारांपेक्षा नोटा अधिक मतदान झाले आहे. या ग्रामपंचायतीचे सात सदस्य आहेत. त्यापैकी तीन जागा बिनविराेध निवडून आल्या आहे. दाेन जागांवर उमेदवारांनी अर्ज भरले नाहीत. येथे केवळ दाेन जागांसाठी निवडणूक झाली. या दोन्ही जागेवर ग्रामस्थांनी नोटाला पसंती दिली आहे. एका प्रभागात 211 तर अन्य प्रभागात 217 मत नाेटाला मिळाली आहेत. या ठिकाणी ज्ञानेश्वर पाचे विरुध्द जयवंत माढंरे आणि चंद्रभागा कदम विरुध्द चैञाली कदम यांच्यात लढत हाेती. सध्या या उमेदवारांचा निकाल प्रलंबित ठेवल्याची माहिती मतदान माेजणी केंद्रातील अधिका-यांनी दिली.
उमेदवारांना नव्हे तर मतदारांची नाेटाला पसंती
Gram Panchayat Election Results https://t.co/zoRyMZRVML#GramPanchayatElectionResults pic.twitter.com/V7rlpKoI6f
— Siddharth Latkar (@siddharthSakal) January 18, 2021
Edited By : Siddharth Latkar