Gram Panchayat Results : उदयनराजे, महेश शिंदे, मनाेज घाेरपडेंच्या पॅनेलचा उडाला धुव्वा

सिद्धार्थ लाटकर
Monday, 18 January 2021

जिल्ह्यातील काही संवेदनशील ग्रामपंचायतींचा निकाल लागल्यानंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

सातारा :  सातारा जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य (ता. 15) जानेवारीला मतपेटीत बंद झाले हाेते. आज (साेमवार) सकाळी आठला मतमाेजणीस प्रारंभ झाला. 

सातारा तालुक्यातील अंगापूर वंदनमध्ये ११ जागांसाठी लढत झाली. येथे आमदार शशिकांत शिंदे , आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाच्या एवर्जीनाथ ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व ११ जागांवर विजय मिळविला आहे. खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील एवर्जीनाथ ग्रामविकास महाआघाडी पॅनेलचा पराभव झालेला आहे.

अतीत ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या गटाने 10 जागेवर विजय मिळविला आहे. सलग तीन वर्ष सत्ता अबाधित राखील आहे. अतित विकास पॅनेलने (समृद्धी जाधव, मनोज घोरपडे गट) तीन जागेवर विजय मिळविला आहे.

Gram Panchayat Results Karad : माजी मुख्यमंत्र्यांना जबर धक्का; भाजपची जोरदार मुसंडी

Gram Panchayat Results : शंभूराज देसाई गटाचे वर्चस्व; पाटणकरांची पिछेहाट

ठळक घडामाेडी 

कोंडवे ग्रामपंचायत आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाचा 13 पैकी 10 जागांवर विजय, उदयनराजे गटाला फक्त 3 जागा.

नागेवाडी येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोन्ही गटात लढत झाली. कळकाई पॅनलला ५ तर अजिंक्य ग्रामविकास पॅनलला ४ जागा मिळाल्या.

नांदगाव एकूण जागा 9 : परिवर्तन पॅनलेला एकही जागा नाही..शंभू महादेव पॅनल (उदयनराजे गट - भरत देशमुख) 6 जागेवर विजयी. ग्रामविकास पॅनल (रामभाऊ जगदाळे - शिवेंद्रसिंहराजे गट) 3 जागेवर विजयी

नागठाणे एकूण जागा 17 : चौडेश्वरी पॅनल एकही जागा नाही. अजिंक्य पॅनेल 17 जागेवर विजयी. आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले , सहकारमंत्री बाळासाहेब पाटील गटाची सत्ता अबाधित.

Edited by : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election Results Udayanraje Bhosale Shivendrasinghraje Bhosale Shahsikant Shinde Trending News Satara