esakal | Gram Panchayat Results : राष्ट्रवादी-भाजप आघाडीने सेनेला केले चारीमुंड्या चित!
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara Politics News

पाटण तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या तारळे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून गृहराज्यमंत्र्यांना एकाप्रकारे धक्का बसला आहे.

Gram Panchayat Results : राष्ट्रवादी-भाजप आघाडीने सेनेला केले चारीमुंड्या चित!

sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : जिल्ह्यात ग्रामपंचायतींचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून काही ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना देखील पराभवाची चव चाखायला मिळाली असून नवख्या उमेदवारांना यानिमित्त संधी मिळाली आहे. पाटण तालुक्यातही धक्कादायक निकाल समोर आला असून यात गृहराज्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने दणका दिला आहे. 

पाटण तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या तारळे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून गृहराज्यमंत्र्यांना एकाप्रकारे धक्का बसला आहे. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी-भाजप आघाडीने 10 जागा राखत आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे, तर गृहराज्यमंत्र्यांच्या शिवसेनाला केवळ 7 जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

Gram Panchayat Results निढळला दहा वर्षांनंतर सत्तांतर; माजी सनदी अधिकाऱ्यांच्या गटाला जोर का झटका

तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी-भाजप आघाडीने सेनाला धक्का दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती कितपत सेनेला रुचते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या निकालाने तालुक्यातील राजकीय समीकरणंही बदलण्याची चिन्हे आहे.  

Gram Panchayat Results : महेश शिंदेंनी चाखली शशिकांत शिंदेंच्या गावात विजयाची ‘हॅट्‌ट्रिक’

संपादन : बाळकृष्ण मधाळे