
कॉंग्रेसच्या वॉर्ड क्रमांक तीनमधील अनिता यादव यांचा केवळ एक मताने पराभव झाला. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीच्या स्मिता लोहार विजय झाल्या.
कोपर्डे हवेली (जि. सातारा) : कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध कॉंग्रेस अशी पारंपरिक लढत झाली. त्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली असली, तरी काठावरील सत्ता आहे. कॉंग्रेसच्या वॉर्ड क्रमांक तीनमधील अनिता यादव यांचा केवळ एक मताने पराभव झाला. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीच्या स्मिता लोहार विजय झाल्या. यादव यांचा केवळ एका मताने झालेल्या पराभवामुळे कॉंग्रेसच्या सत्तांतराची संधी हुकली. सत्ताधारी राष्ट्रवादी आठ, तर कॉंग्रेसला सात जागा मिळाल्या.
राष्ट्रवादीचे नेतृत्व सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण व माजी संचालक बळवंतराव चव्हाण, तर कॉंग्रेसचे नेतृत्व बाजार समितीचे माजी सभापती हिंदुराव चव्हाण आणि कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांनी केले. दोन्ही गटांकडून प्रभावी प्रचार यंत्रणा होती. अटीतटीच्या लढतीत कॉंग्रेसचा एक उमेदवार एका मताने पराभूत झाला अन् सत्तेचे पारडे राष्ट्रवादीच्या दिशेने फिरले. त्यामुळे कॉंग्रेसची सत्तांतराची संधी हुकली, तर राष्ट्रवादीची सत्ता अबाधित राहिली. कॉंग्रेसच्या एका उमेदवारचा एका मताने पराभव झालेला त्यांच्या जिव्हारी लागला आहे. परिणामी हातातोंडाशी आलेली सत्ता गमवण्याची कॉंग्रेसवर वेळ आली. काठावर मिळालेले यश राष्ट्रवादीला आत्मचिंतन करायला लावणारे आहे.
Gram Panchayat Results : महेश शिंदेंनी चाखली शशिकांत शिंदेंच्या गावात विजयाची ‘हॅट्ट्रिक’
विजयी उमेदवारांना मिळालेली मते
राष्ट्रवादी पुरस्कृत विजयी उमेदवार : दत्तात्रय चव्हाण (522), शकुंतला चव्हाण (540), शुभांगी चव्हाण (555) नेताजी चव्हाण (417), स्मिता लोहार (414), सीमा साळवे (522), सुनील सरगडे (452), उज्ज्वला होवाळ (493)
कॉंग्रेस पुरस्कृत विजयी उमेदवार : अंजनी चव्हाण (422), अमित पाटील (513), वंदना लोहार (471), शोभा चव्हाण (468), रघुनाथ खरात (539) व नानासाहेब चव्हाण (597), दत्तात्रय काशीद (463).
संपादन : बाळकृष्ण मधाळे