दिवाळीनंतर 881 ग्रामपंचायतींच्या निवडणुका; आजपासून साता-यात वॉर्ड रचना, आरक्षण प्रक्रिया
सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे मार्चमध्ये थांबविण्यात आलेली ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. शासनाच्या सूचनेनुसार जुलै ते डिसेंबरअखेर मुदत संपलेल्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी वॉर्ड रचना व आरक्षणे टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आजपासून (साेमवार, ता. दोन नोव्हेंबर) जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने वॉर्ड रचना व आरक्षणांना प्रसिध्दी दिली जाणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर डिसेंबरपर्यंत कुठल्याही क्षणी जिल्ह्यातील 881 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
मार्चमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे लॉकडाउन करण्यात आले. परिणामी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया 27 मार्च रोजी थांबविण्यात आली. सर्व ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी व सदस्यांना मुदतवाढ मिळाली. कोरोनाच्या काळात निवडणुकीच्या माध्यमातून संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने ही प्रक्रिया थांबविण्यात आली. जुलै ते डिसेंबरअखेर मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 881 ग्रामपंचायतींच्या सदस्यांना याचा फायदा झाला. पण, आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी कमी होत असून, लॉकडाउनही उठविण्यात आले आहे. सर्व परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे शासनाने 27 ऑक्टोबर रोजी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची वॉर्ड रचना व आरक्षणे काढण्याची सूचना केली आहे.
शिवसैनिक सक्षम; सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवणार : उदय सामंत
त्यानुसार सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभाग या प्रक्रियेत व्यस्त झाला आहे. प्रत्येक तहसीलदारांवर त्यांच्या तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची वॉर्ड रचना व आरक्षणे काढण्याची सूचना केली आहे. त्यानुसार सध्या ही प्रक्रिया युध्दपातळीवर सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या आरक्षणे व वॉर्ड रचनेची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 881 ग्रामपंचायतींचा दिवाळीनंतर किंवा डिसेंबरअखेरपर्यंत निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती सातारा, कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील आहेत.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
मुदत संपलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशी आहे. सातारा 135, कोरेगाव 55, जावळी 75, वाई 76, महाबळेश्वर 41, खंडाळा 57, कऱ्हाड 104, पाटण 107, फलटण 80, माण 61, खटाव 90.
साता-याच्या भाजप युवा मोर्चात संघटनात्मक बदल करणार : विक्रांत पाटील
हद्दवाढीत ग्रामपंचायती कमी होणार...
सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे यामध्ये समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायती या निवडणुकीतून वगळल्या जाणार आहेत. त्यामुळे सातारा तालुक्यातील काही ग्रामपंचायती कमी होणार आहेत. त्यामुळे सध्या 135 आकडा सांगितला जात असला तरी तो कमी होणार आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.