फलटणला आजीचा नातवाकडून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder of brother from money landlordism in kasbe tarale kolhapur

फलटणला आजीचा नातवाकडून खून

फलटण शहर - वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटपावरून नातवाने चिडून जाऊन केलेल्या मारहाणीत आजीचा मृत्यू झाला आहे. मंगल बबन शिंदे (वय ६५, रा. विमानतळानजीक ठाकूरकीमळा, ता. फलटण) असे दुर्दैवी आजीचे नाव आहे.

याबाबत आनंदा बबन शिंदे (रा. ठाकूरकीमळा) यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की माझा पुतण्या आकाश सुखदेव शिंदे (मूळ रा. ठाकूरकी हल्ली मुक्काम आर्वी, ता. पंढरपूर) याने त्यांच्यात व आमच्यात असलेल्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटपावरून आज सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास फलटण विमानतळातील पश्चिम भागातील मोकळ्या जागेत त्यांची आई मंगल बबन शिंदे यांना चिडून जात रागाच्या भरात काठीने मारहाण केली व डोक्यात दगड मारला. या मारहाणीत मंगल शिंदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकाश शिंदे याच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पीएसआय शिंदे करीत आहेत.

टॅग्स :crimemurderPhaltan