Greater Flamingo sighting
esakal
गोंदवले (जि. सातारा) : सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील पाणथळ परिसरात हिवाळ्यात आढळणाऱ्या ‘ग्रेटर फ्लेमिंगो’नी यंदा आपल्या नेहमीच्या अधिवासाला पाठ दाखवत पावसाळ्यात हजेरी लावली (Greater Flamingo at Rajewadi Dam,) आहे. याबाबत पक्षी अभ्यासक डॉ. प्रवीण चव्हाण यांनी नुकतीच ‘ई-बर्ड’ जागतिक पक्षी नोंद प्रणालीवर राजेवाडी धरणावरील पाच प्रौढ फ्लेमिंगोची नोंद केली. ऑगस्ट महिन्यात झालेले हे दुर्मिळ दर्शन पक्ष्यांच्या बदलत्या अधिवासाकडे लक्ष वेधणारे ठरले आहे.