Weekend Lockdown Effect : किराणा, औषध दुकानदारांसह किरकाेळ व्यावसायिक बनले लुटारु; सातारकरांची फौजदारीची मागणी

Weekend Lockdown Effect : किराणा, औषध दुकानदारांसह किरकाेळ व्यावसायिक बनले लुटारु; सातारकरांची फौजदारीची मागणी

सातारा : वस्तूंचा पुरवठा कमी असल्याचे कारण पुढे करत साताऱ्यातील दुकानदारांनी जीवनाश्‍यक वस्तूंच्या दरात अघोषित वाढ केली आहे. अघोषित वाढ करत सर्वसामान्यांकडून जास्तीचे पैसे उळकत दुकानदारांनी दिवसाढवळ्या सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचे काम सुरू केले असून, हे रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या लॉकडाउनमधून जीवनाश्‍यक सेवा पुरविणाऱ्या दुकानांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये औषधे तसेच किराणा व खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांचा समावेश आहे. गेले सहा दिवस कोणत्या ना कोणत्या कारणाने दुकानदार, व्यापाऱ्यांनी बिस्कीट पुड्यापासून पाण्याच्या बाटली आणि काडीपेटीपासून तेल पिशवीपर्यंतच्या विविध वस्तूंमध्ये मनमानी वाढ केली आहे. अत्यावश्‍यक सेवांची वाहतूक करण्यास प्रशासनाने मुभा दिली असतानाही वाहतूक बंद आहे, माल मिळत नाही, स्टॉकिस्टच जास्त पैसे घेतोय, साठा कमी आहे, पुरवठा थांबलाय आदी अशी अनेक कारणे सांगत किरकोळ दुकानदार सर्वसामान्यांकडून जास्तीचे पैसे उकळत आहेत.
 
पाच रुपयांच्या घरातील बिस्कीट, नुडलच्या पुड्यासाठी सध्या सातारकर सहा ते सात रुपये मोजत आहेत. किराणा मालाच्या दरात झालेली वाढ सोसत असतानाच भाजीपाल्याच्या दरातदेखील व्यापाऱ्यांनी जास्तीची वाढ करून ठेवली आहे. मंडई बंद असल्याचा फायदा उचलत दारावर भाजी विक्री करणाऱ्यांनी 15 रुपयांच्या घरात असणारी कोथिंबीर पेंडी 30 ते 40 च्या घरात नेऊन ठेवली आहे. याबरोबर मेथी, पालक, कांदा पात, पोकळा, तांदळी या पालेभाज्यांची विक्री दुप्पट दराने होत असून, 40 रुपयांना विकली जाणारी भेंडी आता 100 ला विकली जात आहे. दहा रुपये किलोने गेल्या गुरुवारी विकले जाणारे टोमॅटो सध्या 60 च्या पुढे जावून थांबले आहे.
 
गत लॉकडाउनमध्ये दहा रुपयांची वस्तू 40 रुपयांना विकण्याचा विक्रम सुध्दा साताऱ्यातील दुकानदारांच्या नावावर नोंदला आहे. कोरोना, लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे अगोदरच मोडले असताना पुन्हा पुकारलेल्या लॉकडाउनमध्ये दुकानदारांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशातील रोकड ओढून घेण्याचे काम सुरू केले आहे.

कोरेगावातील कोरोना केअर सेंटरसाठी आमदार महेश शिंदेंचे माेठे याेगदान

दुकानदारांवर फौजदारी करण्याची मागणी 

दुकानदारांचे हे लूटचक्र मोडून काढण्यासाठी प्रशासनाने जीवनाश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेत जास्त पैसे उकळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वसामान्य सातारकरांमधून होत आहे.

नागरिकांनी तक्रारींसाठी पुढाकार घ्यावा

एक दाेन रुपये जास्त दिल्याने कूठे बिघडते आपली साेय हाेत आहे ना अशी भावना नागरिकांनी बाेलून दाखविली. तर नागरिकांनी आम्हांलाही असा अनुभव येत असल्याचे सांगितले. आपणांस देखील असा अनुभव येत असेल एमआरपी पेक्षा जादा दराने काेण माल विकत असेल तर जरुर संबंधित दुकानादारास बिल मागा. तुम्हा तुमच्या गावातील दुकानदाराच्या तक्रारी व्हिडिआेसह  sakal_satara@esakal.com या मेलवर पाठवाव्यात.

नगराध्यक्षांकडून लोकशाहीचा खून; अफजल सुतारांचा घणाघात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com