Smarat Meter : स्मार्ट मीटर सक्‍तीला वाढता विरोध; जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनाची धार जोरदार

सातारा जिल्ह्यात अनेक भागांत स्मार्ट वीजमीटरच्या विरोधात नागरिक, शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहेत.
Smart Meter

Smart Meter

sakal 

Updated on

सातारा - जिल्ह्यात अनेक भागांत स्मार्ट वीजमीटरच्या विरोधात नागरिक, शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहेत. वीज वितरण कंपन्यांकडून विनापरवानगी जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असताना याबाबत आता लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराचे अचूक मोजमाप, रिअल-टाइम माहिती आणि बिलिंगमधील पारदर्शकता वाढेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी बिल वाढ आणि खासगीकरणामुळे अनेक ग्राहकांनी या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com