हुतात्मा सचिन जाधव यांना साश्रूनयनांनी निरोप!

यशवंत बेंद्रे
Saturday, 19 September 2020

हुतात्मा सचिन संभाजी जाधव यांना भारत-चीन सीमेवर लेह-लडाख भागात वीरमरण आलं. १६ सप्टेंबरला कर्तव्य बजावत असताना ते हुतात्मा झाले. सचिन 111 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नाईक पदावर कार्यरत होते.

तारळे (जि. सातारा) : हुतात्मा सचिन संभाजी जाधव यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यामधील दुसाळे या त्यांच्या मुळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जाधव कुटुंबीयांसह उपस्थितांनी साश्रुनयनांनी हुतात्मा सचिन जाधव यांना अखेरचा निरोप दिला. 

जाधव यांना भारत-चीन सीमेवर लेह-लडाख भागात वीरमरण आलं. १६ सप्टेंबरला कर्तव्य बजावत असताना ते हुतात्मा झाले. सचिन 111 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नाईक पदावर कार्यरत होते.

ते देशासाठी लढले, अमर हुतात्मे झाले; सचिन जाधव अमर रहे! 

दरम्यान, शासनाच्या वतीने राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, पाटणचे तहसीलदार समीर यादव यांनीही आदरांजली वाहिली. 

चिनी ड्रॅगनला चारीमुंड्या चित करु : माजी सैनिकांचं सळसळलं रक्त

नाईक सचिन संभाजी जाधव यांना 16 सप्टेंबर 2020 रोजी सैन्यामध्ये सेवा बजावताना वीर मरण प्राप्त झाले होते. दुसाळे गावातून सजवलेल्या गाडीतून त्यांची अंत्य यात्रा काढण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ते नियम पाळून ग्रामस्थांनी आपल्या शूर भूमिपुत्राचे अतिशय शोकाकुल वातावरणात शेवटचे दर्शन घेतले. याप्रसंगी 'जवान सचिन जाधव अमर रहै'च्या घोषणा देण्यात आल्या.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Balasaheb Patil and Minister Of State For Home Affairs Shambhuraj Desai Paid Tributes Satara News