हुश्श! पालकमंत्री बाळासाहेब पाटलांनी सातारा जिल्हावासियांना दिले 'हे' आश्वासन

प्रवीण जाधव
Sunday, 26 July 2020

जिल्ह्यातील प्रत्येक चेक पोस्टची पाहणी केली असून, पोलिस प्रशासन योग्यरीत्या काम करीत असल्याचे गृह राज्यमंत्री देसाई यांनी या वेळी सांगितले. ​

सातारा : शासनाने निवडलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांना योग्य उपचार मिळतात का, याच्या नियोजनासाठी तपासणी अधिकारी व ऑडिटरची नियुक्ती केली असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. बैठकीला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
पत्रास कारण की.. हेच विसरत चाललोय आपण!
 
श्री. पाटील म्हणाले, ""कोरोना साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आदेश दिले आहेत. या योजनेची अंमलबजावणी शासन निर्णयाप्रमाणे होते किंवा कसे याची तपासणी, तसेच रुग्णाचे आकारण्यात आलेले देयक योग्य आहे का आणि देयकाचा कालावधी बरोबर आहे याच्या तपासणीसाठी, अधिकारी, ऑडिटर, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये कृष्णा हॉस्पिटल, कऱ्हाडमधील शारदा क्‍लिनिक व सह्याद्री हॉस्पिटल, बेल एअर हॉस्पिटल पाचगणी, गीतांजली व संचित हॉस्पिटल वाई, जगताप हॉस्पिटल शिरवळ, मंगलमूर्ती व संजीवनी हॉस्पिटल सातारा व मायणी मेडिकल कॉलेज खटाव या ठिकाणी अधिकारी नेमण्यात आले आहेत.''

गृहमंत्र्यांसमाेर त्याचे गंभीर वर्तन, कदाचित मोठी किंमत मोजावी लागली असती

कोरोनाच्या संकटातही सर्वसामान्यांसाठी शासनाचा 'हा' विभाग ठरताेय याेध्दा
 
जिल्हा रुग्णालयात येत्या आठ दिवसांत अत्याधुनिक कोरोना टेस्टिंग लॅब सुरू होईल. यामुळे कोरोना टेस्टिंगचे अहवाल लवकरात लवकर मिळून बाधितांवर तत्काळ उपचार करणे शक्‍य होणार आहे, असे सांगतानाच लग्नकार्यामुळे राज्यात प्रादुर्भाव झाल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी रीतसर परवानगी घेऊन, तसेच 20 लोकांच्या उपस्थितीतच विवाह करावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. जिल्ह्यातील प्रत्येक चेक पोस्टची पाहणी केली असून, पोलिस प्रशासन योग्यरीत्या काम करीत असल्याचे गृह राज्यमंत्री देसाई यांनी या वेळी सांगितले. 

महाबळेश्‍वरचा मृत्यूदर सर्वाधिक 

जिल्ह्यामध्ये जावळी तालुक्‍याचा मृत्युदर 3.5, कऱ्हाड 2.04, खंडाळा 3.84, खटाव 7.58, कोरेगाव 3.2, माण 5.68, पाटण 5.28, फलटण 4.39, सातारा 3.09 व वाईचा 3.31 टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मृत्युदर हा महाबळेश्वर तालुक्‍यात 16.66 टक्के आहे. जिल्ह्याचा एकूण मृत्युदर 3.55 असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

हा धबधबा पहायला गेला तर कारवाई

कारगिल विजय दिवस... युद्ध का आणि कसे घडले

जर्मनीतील पतीचा जबाब नोंदविला गेला अन् न्यायनिवाडा झाला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Balasaheb Patil Assures Corona Testing Lab Will Be Activated Soon In Satara