कोविड नियंत्रणासाठी ताबडतोब ९१ कोटींचा निधी द्या : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सचिन शिंदे
Wednesday, 9 September 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील स्थिती गंभीर असून कोविडने संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात जंबो हॉस्पिटलला मान्यता मिळाली आहे. सध्याच्या स्थितीत निधी अभावी हॉस्पिटल उभारणीस विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कऱ्हाड (जि. सातारा) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन, जिल्ह्यातील कोविड रुग्णांवर तात्काळ उपचारासाठी ९१ कोटी ८४ लाख १५ हजारांचा निधी द्या, अशी मागणी सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील स्थिती गंभीर असून कोविडने संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. 

त्यावर तात्काळ नियंत्रणासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात जंबो हॉस्पिटलला मान्यता मिळाली आहे. सध्याच्या स्थितीत निधी अभावी हॉस्पिटल उभारणीस विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे २५० खाटांचे ऑक्सिजन बेड, हॉस्पिटल, अनुषंगिक साधन सामुग्री, मनुष्यबळासाठी ३६ कोटी ५५ लाख ३२ हजारांच्या निधी गरज आहे. तो उपलब्ध व्हावा, त्याचप्रमाणे काशिळ येथे ट्रामा सेंटर उभा करायचे आहे. तेथे ५० आयसीयू बेड, नवीन हॉस्पिटलसह त्याच्या अनुषंगिक साहित्य खरेदीसाठी रुपये ४ कोटी ८४ लाख ९३ हजारांच्या निधीची गरज आहे.

उदयनराजेंचंच श्रेय, शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; कार्यकर्त्यांचा दावा! 

बाधित व्यक्तीसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, वैद्यकीय देखभाल, दुरुस्ती, प्रयोगशाळा चाचणी, व्हेंटिलेटर हवा शुद्धीकरण यंत्रासह अनुषंगिक प्रशासकीय साधनसामग्री खर्चासाठी पाच कोटी ०४३ लाख ९० हजारांच्या निधीची गरज आहे, असा ९१ कोटी ८४ लाक १५ हजारांच्या निधीच गरज आहे. तो निधी त्वरित द्यावा. त्याबरोबर जिल्हा रुग्णालयात फिजिशियन पद चार वर्षे रिक्त आहे त्या पदासह अन्य रिक्त पदे भरण्यासह तत्काळ मंजुरी देण्याची मागणी पालकमंत्री पाटील यांनी राज्य प्रशासनाकडे केली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Balasaheb Patil Demands Rs 91 Crore For Satara District Satara News