अजित पवारांमुळेच सिंचन योजना मार्गी : पालकमंत्री पाटील

गजानन गिरी
Friday, 23 October 2020

उत्तर दुष्काळी भागाला धनगरवाडी-हणबरवाडी पाणीउपसा योजनेद्वारे पाणी मिळावे, असे ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचे स्वप्न होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे हेळगावनजीक योजनेच्या कामाचा प्रारंभ झाला असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

मसूर (जि. सातारा) : पश्‍चिम महाराष्ट्रातल्या पाणी योजना या युती सरकारने रखडवल्या होत्या. त्यातील धनगरवाडी-हणबरवाडी पाणीउपसा सिंचन योजनेला अडचणी आणल्या. आता सिंचन योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही. 20 वर्षांपासून रखडलेल्या योजनेच्या कामास गती आली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

किवळ येथे हणबरवाडी योजनेच्या कामाच्या पाहणी श्री. पाटील यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. निवृत्त शासकीय अधिकारी तानाजीराव साळुंखे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सभापती प्रणव ताटे, चंद्रकांत जाधव, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, संगीता साळुंखे, शहाजी क्षीरसागर, शालन माळी, उपअभियंता घोलप उपस्थित होते. 

महाबळेश्वरातील शेतकऱ्यांना वेगळ्या निकषाची गरज नाही : दरेकर

ते म्हणाले, उत्तर दुष्काळी भागाला धनगरवाडी-हणबरवाडी पाणीउपसा योजनेद्वारे पाणी मिळावे, असे ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचे स्वप्न होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे हेळगावनजीक योजनेच्या कामाचा प्रारंभ झाला. मागील शासनाने 16 कोटींची तरतूद केली. योजनेचा आराखडा बदलला. भाजपचे आरोप करायचे धोरण असते. त्यानंतर उत्तर त्यांच्याकडे नसते. या योजनेमुळे अंतवडी, मसूर, किवळला लाभ मिळेल. तानाजीराव साळुंखे यांनीही मार्गदर्शन केले. माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विजय साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सुहास साळुंखे यांनी स्वागत केले. रामभाऊ साळुंखे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Balasaheb Patil Inspected Dhangarwadi-Hanbarwadi Water Upsa Irrigation Scheme Satara News