पाऊस सुरू असेपर्यंत पंचनामे : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

पाऊस सुरू असेपर्यंत पंचनामे : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांत कमी दाबाच्या पट्यामुळे झालेल्या पावसामुळे 22 हजार 585.89 हेक्‍टर एवढ्या क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. बाधित शेतकऱ्यांची संख्या 89 हजार 041 एवढी आहे. मात्र, अजून पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे पाऊस सुरू असेपर्यंत पंचनामे सुरू ठेवा, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. दरम्यान, 65 मिलिमीटरपेक्षाही कमी पाऊस होऊन नुकसानी झाली आहे. त्यासाठी निकषात बदल करावा, अशी मागणी आमदारांनी पालकमंत्र्यांकडे केली.
 
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार गौडा उपस्थित होते.

शेतीचे नुकसान पाहून पृथ्वीराज चव्हाणांचे मन हेलावले
 
जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेले क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) तालुकानिहाय असे आहे. सातारा तालुका : 1109.72, कोरेगाव 503.20, खटाव 2994.71, फलटण 3765.05, माण 9298.26, वाई 567.57, जावळी 435.60, खंडाळा 232.78, महाबळेश्वर 564.02, कऱ्हाड 1048.95, पाटण 2066.03 असून, एकूण 22 हजार 585.89 हेक्‍टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. अतिवृष्टीमुळे मालमत्तांचेही नुकसान झाले असून, यामध्ये रस्ते व मोऱ्या दुरुस्ती 470 कामे, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती 45 कामे, प्राथमिक आरोग्य केंद्र पुळकोटी वीज पडल्याने स्लॅबचे दुरुस्ती एक, स्मशानभूमी कट्टा/निवारा दुरुस्ती 17, इमारतीस तडे गेल्याने दुरुस्ती, पत्रा व दरवाजे दुरुस्ती 17, बंधारे दुरुस्ती 40, शाळा इमारतीस तडे गेल्याने दुरुस्तीची तीन कामे असे एकूण 590 मालमत्ताचे नुकसान झाले आहे.

साता-यातील गुरुवार बागेतून झाेपाळे चाेरीस

अतिवृष्टीमुळे एकूण 105 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये वडूज येथील 48 गावे व फलटण येथील 57 गावांचा समावेश आहे. 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या बाधित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळते; पण अनेक ठिकाणी त्यापेक्षा कमी पाऊस होऊनही नुकसान झाले आहे. त्याबाबतीत शासनाला अवगत करावे, अशी मागणी सर्व आमदारांनी पालकमंत्र्यांकडे केली.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com