वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय नको

पालकमंत्री पाटील यांच्या सूचना; फलटणमध्ये पालखी तळाची पाहणी
Guardian Minister Patil inspected the palanquin bottom in Phaltan
Guardian Minister Patil inspected the palanquin bottom in PhaltanSakal

फलटण शहर - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा फलटण शहरात दोन दिवस व तालुक्यात चार दिवस मुक्काम असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील पालखी तळ, सकाळची न्याहरी, दुपारचा विसावा आदी ठिकाणांची व तेथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान, पालकमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

पालकमंत्री पाटील यांच्यासमवेत आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी अमिता गावडे आदींसह वीज, आरोग्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद व सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

फलटण येथील पालखी तळावर असलेली संपूर्ण व्यवस्था पालकमंत्री पाटील यांनी प्रांताधिकारी डॉ. जगताप यांच्याकडून नगरपालिकेने खास तयार केलेल्या नकाशाद्वारे समजावून घेतली. विशेषतः सोहळ्यातील रथापुढील व रथामागील दिंड्या, पालखी ठेवण्याची जागा, सुरक्षाविषयक व्यवस्था, पालखी तळावरील वीज, पाणी, आरोग्य सुविधा या सर्व बाबींची माहिती घेतली. कोणत्याही प्रकारे वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

वारकरी भाविकांसाठी पालखी तळावर लावण्यात येणारे किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे स्टॉलच्या नियोजनाबाबत माहिती घेऊन कोणत्याही परिस्थितीत त्याचा वाहतुकीस व पालखी तळावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. पालखी सोहळा मुक्काम दोन दिवस असल्याने स्वच्छतागृहाची व्यवस्था व सोहळ्याचे प्रस्थान झाल्यावर पालखी तळ व परिसराची स्वच्छता याविषयी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेऊन त्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. राज्याच्या अन्य भागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी आळंदी-पंढरपूर व सोहळ्याच्या मार्गावर कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा नसला तरी शासन व प्रशासन त्याबाबत दक्ष असून, वैद्यकीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com