ना डांबर, ना मुरुम असा रस्ताच नकाे म्हणत, गुंडेवाडीतील युवकांनी पाडले काम बंद

ना डांबर, ना मुरुम असा रस्ताच नकाे म्हणत, गुंडेवाडीतील युवकांनी पाडले काम बंद

मायणी (जि. सातारा) : पुरेसे डांबर न वापरता निकृष्ट व अयोग्य पद्धतीने सुरू असलेले मायणी ते गुंडेवाडी दरम्यानच्या रस्त्याचे काम गुंडेवाडीच्या संतप्त तरुणांनी बुधवारी बंद पाडले. बांधकामच्या अधिकाऱ्यांनी येऊन निकृष्ट कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी या तरुणांनी केली आहे.
 
पंढरपूर ते मल्हारपेठ रस्त्याच्या दर्जोन्नतीचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत ठिकठिकाणी टप्प्याटप्प्याने रस्त्याचे काम करण्यात येत आहे. त्या मार्गावरील मायणी- यलमार वस्ती ते पवार मळा व गुंडेवाडीदरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. पुरेसे डांबर वापरले जात नसल्याने त्यावरील रोलिंग केलेली खडी उखडून गेली आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्यासाठी कठीण मुरुमाऐवजी काळी माती वापरली जात आहे. त्यामुळे काळ्या मातीत वाहने फसून अपघात होत आहेत, असे या तरुणांचे म्हणणे आहे. रस्त्याचे काम टेंडरनुसार करण्याची मागणी करत गुंडेवाडीच्या तरुणांनी या रस्त्याचे काम बंद पाडले. त्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारासही यावे, रस्त्याचे दर्जेदार काम करण्यासंबंधी ग्रामस्थांनासमोर सूचना द्याव्यात, अशी मागणी तरुणांनी केली आहे. या सूचनांची कार्यवाही होत नसल्यास कोणत्याही परिस्थितीत काम सुरू होऊ देणार नसल्याची भूमिकाही तरुणांनी घेतली आहे.

डोंगराळ भागात युवकांनी फुलविली बाग; शिवप्रेमी प्रतिष्ठानचा उपक्रम 

दरम्यान काम बंद पाडूनही संबंधित ठेकेदार व कोणीही अधिकारी ग्रामस्थांच्या भेटीसाठी आला नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्यातील अर्थपूर्ण संबंध त्यामुळे स्पष्ट होत असल्याचा आरोप माजी सरपंच दत्तात्रय निकम यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे काम थांबविण्यासाठी संतोष निकम, दीपक निकम, शंकर थोरात, गौरीहर निकम या यांच्यासह नागरिकांनी पुढाकार घेतला.

Edited By : Siddharth Latkar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com