
कऱ्हाड : आघाडी आणि युतीची गेल्या काळात अपरिहार्यता होती. आघाडी आणि युतीमुळे देश व महाराष्ट्राच्या पातळीवर काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले आहे. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी जे पक्ष बरोबर येतील, त्यांच्यासह पुढे जाणार आहोत. प्रसंगी राजकीय उत्तरदायित्व समजून एकाकी झुंज देण्यासाठीही काँग्रेस पक्ष तयार आहे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आज येथे स्पष्ट केली.