

Krishna Sugar Factory Election: Bhosale-Led Sahakar Panel Wins All 21 Seats
sakal
कऱ्हाड : दक्षिण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने विरोधी संस्थापक पॅनेलचा २१ विरुद्ध शून्य असा पराभव करत विजयाची हॅट्ट्रीक साधली. पहिल्या फेरीपासून सहकार पॅनेलची घोडदौड कायम ठेवल्याने अंतिम फेरीअखेर ‘सहकार’ने सुमारे १४ हजार ७०० मताधिक्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांवर विजय मिळवला. निकालानंतर समर्थकांनी विजयी जल्लोष केला. सायंकाळी भर पावसातही गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.