कोळे : विंग (ता. कऱ्हाड) येथे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात अतिसाराचे १७ रुग्ण आढळले. २४ बाय ७ नळ पाणी योजनेच्या मुख्य वाहिनीला गळती निर्माण झाली होती. दूषित पाण्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. .gang thieves behind bars : ट्रान्सफॉर्मर चोरांची टोळी गजाआड; फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याची कामगिरी.गळती काढली असून, शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने केले आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी अचानक जुलाबाची लक्षणे काही ग्रामस्थांना आढळून आली. रुग्णांत वाढ झाल्याने भीती निर्माण झाली..माहिती मिळाल्यानंतर कोळे प्राथमिक आरोग्य विभाग दाखल झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया बनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाशराजे कदम, विंग उपकेंद्राच्या डॅा. अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक राजेंद्र गरुड, संतोष जाधव, दीपक पाटील, युवराज शेवाळे व आशा सेविकांनी आज सर्वेक्षण मोहीम राबवली. अतिसाराचे १७ रुग्ण त्यात आढळले. रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले..फिल्टर प्लँटपासून मुख्य टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती झाली होती. त्यातून अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याचे विभागाने माहिती देताना सांगितले. जलवाहिनीची गळती काढण्यात आली आहे, तरीही रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे..Ashutosh Ghorpade : अभय योजनेचा लाभ घ्यावा : आशुतोष घोरपडे.पाणी उकळून प्यावेदरम्यान, जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याची तपासणी घेण्यात आली. ती निगेटिव्ह आढळून आली, तरीही ग्रामस्थांनी पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.