कास, प्रतापगडला नाचणीसह भात शेतीचे नुकसान

सिद्धार्थ लाटकर
Friday, 16 October 2020

रानटी जनावरांकडून पण शेतीचे नुकसान हाेत असल्याने प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन भरपाई द्यावी अशी मागणी हाेत आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील कास आणि प्रतापगड या दाेन्ही पर्यटनस्थळी पावसामुळे नाचणी तसेच भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापुर्वी या भागात रानटी जनावरांचा सुळसुळाट हाेता. त्यामुऴे शेतीचे नुकसान हाेत हाेते. आता परतीच्या पावसामुळे शेतीचे विशेषतः भात शेतीचे माेठे नुकसान झाले आहे. 

कास आणि प्रतापगड या भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. आधीच कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय पुर्णपणे बंदच आहे. शेती करून हातातोंडाशी आलेले पिक या परतीच्या पावसामुळे हातातून गेले आहे .

अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा देखील केला असून सतत मागणी करुन देखील विमा कंपनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नाचणी तसेच भात पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.

परतीचा तडाखा! सातारा जिल्ह्यात दीड हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान

कास परिसरातील शेतकरी देखील दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे रानटी जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. पावसामुळे शेतीची राखण करता येईना. त्यातच रानटी जनावरांकडून पण नुकसान हाेत असल्याने प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन भरपाई द्यावी अशी मागणी हाेत आहे.

गव्यांच्या कळपाने घेरल्यावरही तो डगमगला नाही ; सिंधुदुर्गातील स्पेशल चाइल्डची संघर्षमय कहाणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain Caused Loss Of Frams In Kass Pratapgad Satara News