सातारा : शेतक-यांच्या डाेळ्यांत पाणी : भात, साेयाबीनचे नुकसान

सातारा : शेतक-यांच्या डाेळ्यांत पाणी : भात, साेयाबीनचे नुकसान

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आज (बुधवार) पहाटेपासून संततधार तसेच काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे खरीप पेरणी खाेळंबली आहे. काही तालुक्यांत भात शेतीचे, साेयाबीनचे नुकसान झाले आहे. 

भारतीय हवामान खात्याने येत्या शनिवारपर्यंत (ता.17) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्हा प्रशासनानेही नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज (बुधवार) पहाटेपासून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसास प्रारंभ झाला आहे.

सांगलीत डाळिंब, द्राक्ष, केळीसह भाजीपालाचे नुकसान 

खटाव, निढळ, जाखणगाव परिसरात सुमारे एक तास झाले संततधार सुरू आहे. बुध, डिस्कळ परिसरात संततधार पाऊस सुरू. मलवडी भागासह उत्तर कोरेगावला रिमझिम पाऊस पडत आहे. तर पुसेगावला मुसळधार पाऊस पडत आहे. कुकुडवाड परिसरात पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेतकरी वर्गाची कामे खाेळंबली आहेत.

लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले, ३५ मंडळात अतिवृष्टी, शेतकरी अडचणीत !

फलटण शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. खंडाळा, शिरवळ येथेही रिमझिम पाऊस पडत असल्याने पिकांना धाेका निर्माण झाला आहे. गोंदवले, पळशी, नरवणे भागात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. सातारा शहरासह काशीळ, कराड शहर, पाटण, तारळे परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.

अक्कलकोट तालुक्यात धुवांधार पाऊस 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात स्ट्राॅबेरीच्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने स्ट्राॅबेरीची लागवड करण्यात फार माेठी अडचण झाल्याचे शेतक-यांनी नमूद केले. आजच्या पावसामुळे एसटीची सेवा, विविध गावांतील बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. सातारा शहरात रिक्षा व्यावसायिकांना पावसामुळे अच्छे दिन आल्याचे चित्र हाेते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com