
सातारा : जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाची संततधार सुरूच असून, सततच्या पावसामुळे (Satara Rain) कृष्णा, वेण्णा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यात ४० च्या आसपास घरांची पडझड होण्यासह लहान-मोठ्या प्रकारातील ३०६ पशुधन पावसामुळे दगावल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून (Collector Office) देण्यात आली. नदीपात्रात वाढणाऱ्या पाणीपातळीमुळे नदीकाठावरील गावांत सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.