'कोयना' शतकाच्या उंबरठ्यावर; धरण क्षेत्रात मुसळधार!

'कोयना' शतकाच्या उंबरठ्यावर; धरण क्षेत्रात मुसळधार!

कोयना नगर (जि. सातारा) : राज्यासाठी वरदायिनी ठरलेले कोयना धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले असून कोयना धरण शतकाच्या उंबरठ्यावर आहे. धरण 99.80 % भरले आहे. कोयना धरण सलग दहा वर्ष पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे राज्यातील शेती सिंचनाबरोबर विजेचा प्रश्न निकालात निघाला आहे. यामुळे शेतकरी वर्गासह उद्योग विश्वावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयना धरणात सध्या 105.03 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 3308 क्यूसेक आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 0.22 टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. हत्ती गेला अन् शेपूट राहिले असून अजून पाणलोट क्षेत्रात परतीचा पाऊस येणे बाकी असल्याने धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा झाल्यावर कोयना धरणाचा पायथा वीजगृह व धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याचे कोयना प्रशासनाने आज (ता. २२) जाहीर केले आहे.

मुसळधार पावसाचे आगार अशी ओळख असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 1 जून ते 15 ऑक्टोबर या 153 दिवसात 7 ते 8 मिलिमीटर पाऊस पडतो. 1 जून ते 15 ऑक्टोबर या 110 दिवसात पाणलोट क्षेत्रात 4,800 पर्यंत पर्जन्यमान झाले आहे. यात कोयनानगर येथे 4245 मिलिमीटर, नवजा येथे 4906 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 4881 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात गतवर्षीचा 34.13 टीएमसी होता. यामुळे जुलैच्या प्रारंभीला कोयना धरण 50 % भरले होते. पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने 15 ऑगस्ट रोजी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले होते. धरणात आतापर्यंत 115 टीएमसी पाण्याची आवक आली आहे.

धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून 19.65 टीएमसी विनावापर तर पायथा वीज गृहातून 9.61 टीएमसी असे 29.26 टीएमसी पाणीसाठा नदीपात्रात सोडण्यात आले आहे, तर 1 जून पासून पश्चिमेकडील वीज प्रकल्प पूर्वेकडील सिंचन व बिगर सिंचन, गळती, बाष्पीभवन असे 45.80 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने सध्या उघडीप घेतली असली तरी परतीचा पाऊस अजून झाला नाही. कोयना धरण सध्या काठोकाठ भरले आहे. परतीच्या पावसामुळे काठोकाठ भरलेले कोयना धरणातून पुन्हा पाणी सोडण्याची शक्यता आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com