जोशीविहीर येथील उड्डाणपुलानजीक पुढे जाणाऱ्या वाहनाला दुचाकीची धडक बसली. यात जुबेर जखमी झाला. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे येथे दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Scene of the fatal highway accident near Bhuinj; police investigation underway.Sakal
भुईंज : पुणे-बंगळूर महामार्गावर काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. जुबेर शब्बीर शेख (वय २५, रा. कुडाळ, ता. जावळी) असे मृताचे नाव आहे.