esakal | खंबाटकी घाटात माणूसकीची दर्शन!
sakal

बोलून बातमी शोधा

खंबाटकी घाटात माणूसकीची दर्शन!

याचवेळी पेट्रोलिंग करत असताना महामार्ग पोलिस सहायक फौजदार प्रकाश घनवट, हवालदार सुनील सोळसकर, विजय बागल, लक्ष्मण जाधव व मनोज गायकवाड यांना ही पर्स नजरेस पडली.

खंबाटकी घाटात माणूसकीची दर्शन!

sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : पुण्याहून सातारा बाजूकडे जाताना खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी महिलेची पर्स गाडी वळवताना गाडीच्या डॅश बोर्डवरून महामार्गावर खाली पडली. ही पर्स वाहतूक पोलिसांना सापडल्यानंतर त्यांनी पर्समधील कागदपत्रांवरून फोन करून पैसे व महत्त्वाची कागदपत्रे असणारी पर्स संबंधित महिलेला वेळे (ता. वाई) येथे परत केली. महामार्ग पोलिसांनी दाखवलेले माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
याबाबत माहिती अशी, पूजा मुडलियार ही महिला कुटुंबीयांसमवेत पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने कारमधून (एमएच 12 एचएल 1078) निघाल्या होत्या. खंबाटकी घाट सुरू होत असतानाच वळणावर गाडीला झोला बसल्याने त्यांची पर्स गाडीतून खाली पडली. मात्र त्यांना पर्स पडल्याचे कळले नाही. याचवेळी पेट्रोलिंग करत असताना महामार्ग पोलिस सहायक फौजदार प्रकाश घनवट, हवालदार सुनील सोळसकर, विजय बागल, लक्ष्मण जाधव व मनोज गायकवाड यांना ही पर्स नजरेस पडली.

त्यांनी पर्समध्ये असलेल्या आधार कार्डवरून संबंधितांना फोन लावला. त्यानंतर ही पर्स पूजा मुडलियार या महिलेची असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या पर्समध्ये पाच हजारांची रोख रक्कम, आधारकार्ड आदी कागदपत्रे होती. त्यानंतर फोनवरून सर्व माहिती घेऊन वेळे येथे ही पर्स परत केली. पूजा मुडलियार व कुटुंबीयांनी महामार्ग पोलिसांनी दाखवलेली तत्परता व प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले. 

अथणी- रयत कारखान्याने एफआरपीपेक्षा दिला जादा दर; शेतकरी समाधानी

घराबाहेर निघालात? थांबा! विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांचे आहे लक्ष

Video पाहा : उदयनराजेंचा जलमंदिर पॅलेस टू सुरुची बंगला प्रवास; सातारकरांच्या भुवया उंचावल्या 

Edited By : Siddharth Latkar