
कऱ्हाड : कोल्हापुरातील एका कुरिअर कंपनीच्या कुरिअर बॉयला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ७० लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग चोरट्यांच्या टोळीने लंपास केली. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वराडे (ता.कऱ्हाड) गावच्या हद्दीत असलेल्या श्रावणी हॉटेलनजीक मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. राहुल दिनकर शिंगाडे (वय २८, रा.शिंगणापूर, ता.माण) असे याप्रकरणी अटक केलेल्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.