
कोळे : पुणे- बंगळूर महामार्गाचे सहापदरीकरण काम करणाऱ्या डी. पी. जैन कंपनीच्या कामगारांचे थकीत पगार व भविष्य निर्वाहचे थकीत हप्ते आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नामुळे त्वरित जमा झाले. त्यामुळे कामगारांतून समाधान व्यक्त होत आहे. कामगारांनी नुकतीच आमदार डॉ. भोसले यांची भेट घेऊन आभार मानले.