कोरेगाव : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांनी (Chhatrapati Rajaram Maharaj) स्वामीनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ सेवेबद्दल कोरेगावचे सरदार राजश्री रखमाजी सुभानजी बर्गे (Rakhmaji Subhanji Barge) यांना अर्धा चावर (४६ एकर) जिरायत जमीन इमाम दिल्याचे मोडी लिपीतील अस्सल दस्तावेज मिळाले आहेत. यावरून सरदार बर्गे घराण्याचे स्वराज्य सेवेतील योगदान अधोरेखित होते.