Satara : ब्रिटिशकालीन साक्षीदार 'वाघोली पूल' होणार जमीनदोस्त, पाडकामाला सुरुवात; वाहनचालकांना ८ किलोमीटरचा वळसा
वाठार रेल्वे स्टेशनहून महाबळेश्वर व पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी ब्रिटिश अधिकारी या मार्गाचा वापर करत. उन्हापासून संरक्षण व्हावे, म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडाची झाडे लावण्यात आली आहेत.
Demolition work begins on British-era Wagholi bridge, forcing an 8-km detour for vehicles.Sakal
पिंपोडे बुद्रुक : वाई-वाठार रस्त्यावरील आयुर्मान संपलेला ११५ वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन वाघोली पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला उत्तर कोरेगावचा ऐतिहासिक ठेवा नामशेष होणार आहे.