तडीपार आदेशाचा भंग करणाऱ्या गुंडास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 अटक

तडीपार आदेशाचा भंग करणाऱ्या गुंडास अटक

सातारा - तडीपार आदेशाचा भंग करत सातारा शहरात फिरणाऱ्या अजय देवराम राठोड (वय २९, रा. लक्ष्‍मी टेकडी, सदरबझार, सातारा) याला काल (ता. २२) सातारा शहर पोलिसांनी ताब्‍यात घेतले. ताब्‍यात घेतलेल्या राठोडच्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. सदरबझारमधील लक्ष्‍मी टेकडी येथे राहणाऱ्या राठोडच्‍या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्‍यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्‍हे नोंद आहेत. त्यामुळे त्‍याला तडीपार करण्‍याचा प्रस्‍ताव सातारा शहर पोलिसांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानुसार राठोडला पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल यांनी एक वर्षे कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपार असणारा राठोड हा शहर परिसरात लपूनछपून फिरत होता. त्याची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्‍याचे उपनिरीक्षक सुधीर मोरे यांना मिळाली. त्‍यांनी कर्मचारी सुजित भोसले, अविनाश चव्‍हाण, ज्योतिराम पवार, विक्रम माने, अभय साबळे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, गणेश घाडगे यांनी राठोडला ताब्‍यात घेतले. सुजित भोसले यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात फिर्याद नोंदवली असून, सहायक फौजदार पवार तपास करीत आहेत.

Web Title: Hooligans Arrested For Violating Deportable Order

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top