
माढा : माढा-कुर्डुवाडी रस्त्यावर गुरुवारी (ता. ७) सकाळी साडेनऊच्या सुमारास एसटी आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. बस आणि कारमधील १६ जण जखमी झाले आहेत. माढ्यापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपासमोरील जुना माढा-कुर्डुवाडी रस्त्यानजीकच्या वळणावर अपघात घडला. अपघातात कारमधील संजय छगन हुबाले (वय ५०, रा. उपळाई बुद्रूक) यांचा मृत्यू झाला असून यशवंत संतोष बेडगे (वय २२, रा. उपळाई बुद्रूक) हे गंभीर जखमी आहेत.