सातारा : रुग्णालय इमारती फायर ऑडिटविनाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयांचे फायर ऑडिट

सातारा : रुग्णालय इमारती फायर ऑडिटविनाच

कऱ्हाड - मोठ्या रुग्णालयांसह वाणिज्य इमारतींना फायर ऑडिटची सक्ती आहे. शहरात वाणिज्य इमारती नाहीत. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांचा सर्व्‍हे सुरू आहे. त्यात शहरातील २०० हून अधिक पैकी केवळ २० रुग्णालयांनी फायर ऑडिट केले आहे. अन्य रुग्णालयांच्या इमारती मात्र फायर ऑडिविनाच असल्याने तेथील सुरक्षा रामभरोसेच आहे. पालिकेनेही फायर ऑडिट सक्तीचे केले असतानाही त्याकडे होणारे दुर्लक्ष रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी घातक आहे.

पालिकेने मासिक बैठकीत फायर ऑडिट सक्तीचे करण्याचा ठराव केला आहे. मात्र, त्याचे व दरवर्षी होणाऱ्या ऑडिटचे दर नंतर ठरवले जाणार आहेत. अग्‍निशमन दलातर्फे फायर ऑडिटचा सर्‍व्‍हे सुरू आहे. फायर ऑडिटला रुग्णालयांच्या इमारतींची पाहणी केली जात आहे. शहरात २०० हून अधिक रुग्णालये आहेत. त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच इमारतींचे फायर ऑडिट झाले आहे. प्रत्येक रुग्णालयाला ऑडिट सक्तीचे आहे. मात्र, येथे ते झालेले नाही. शासनाचा परवाना असणाऱ्यांना फायर ऑडिट सक्तीचे आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विना फायर ऑडिटची रुग्णालये नागरिकांच्या जिवावर बेतणारीच आहेत. इमारतीत अचानक उद्‌भवणाऱ्या संकटाशी सामना करण्यासाठी काहीही सुरक्षितता नाही, असेच फायर ऑडिट न करणाऱ्यांबाबत आहे. त्यामुळे तेथील सुरक्षा रामभरोसे आहे. फायर ऑडिटमध्ये रुग्णालयात वाहन जाते का, आत सुरक्षितता किती आहे, आग विझविण्यासह बाहेर पडण्याचा पर्यायी मार्ग आहे का, साईनबोर्ड आहे का, रुग्णालयातील स्टाफ प्रशिक्षित आहे का, या सगळ्यांची तपशिलाने पाहणी केली जाते. त्यानुसार त्या सुविधा देणारी मोजकीच हॉस्‍पिटल शहरात आहेत. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात अशा सुविधा अधिक महत्त्‍वाच्या आहेत. मात्र, सध्या तरी रुग्णालयांतील सुरक्षितता रामभरोसे आहे, हेच वास्तव आहे.

अग्‍निशामक दलाकडे कर्मचारी संख्या कमी

अग्‍निशमन विभागात १२ कर्मचारी आहेत. हा जुना आकृतीबंद आहे. तोही नवा करण्याची गरज आहे. त्या नियमानुसार विभागात तब्बल २० कर्मचारी कमी आहेत. एका वाहनासाठी सहा कर्मचारी अपेक्षित आहेत. तेवढा स्टाफही विभागाकडे नाही. पालिकेत दोन वाहने आहेत. त्यासाठी १२ कर्मचारी अपेक्षित आहेत. तेही कर्मचारी विभागाकडे नाहीत. अग्‍निशमन विभागाकडून कर्मचारी भरतीची मागणी केली जात आहे. त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याही विभागाचे ऑडिट होणे गरेजेचे आहे.

Web Title: Hospital Building With Out Fire Audit In Karad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top