..तर नागरिकांना बेघर व्हावं लागेल; उत्खननामुळे घरं धोक्यात!

..तर नागरिकांना बेघर व्हावं लागेल; उत्खननामुळे घरं धोक्यात!
Updated on

वाई (जि. सातारा) : जांभळी (ता. वाई) येथील घरांना धोका ठरणारे उत्खनन करणाऱ्यांवर, तसेच या उत्खननास जबाबदार असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन नुकतेच ग्रामस्थ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गट नंबर 32/7 चे शेजारी सुरू असलेल्या उत्खननामुळे घरांना धोका निर्माण झाला आहे. संबंधित क्षेत्रमालक अशोक व अनिल चंद्रकांत कांबळे, किसन सखाराम कांबळे यांनी जागेचे प्रमाणाबाहेर मातीचे खोदकाम केले. खोदकाम घराला लागून केल्याने घराला धोका निर्माण झाल्याची तक्रार आनंदा भीमराव गाडे यांनी केली आहे. खोदकाम जवळजवळ वीस ते पंचवीस फूट खोल आहे. त्यामुळे येथील घरांना वीजपुरवठा करणारे विजेचे पोलही पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर जलवाहिनी तुटण्याच्या धोका निर्माण झाला आहे. या जागेतून पूर्वीची पायवाट होती. 

रायरेश्वर येथून मंडळी याच रस्त्याने येणे-जाणे करत होती. जमीन खोदकाम करणाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी विनंती करूनही ते ऐकत नाहीत. खोदकाम सुरूच आहे. सरपंच व पोलिस पाटील यांनी कोणती दखल घेतली नाही. याबाबत तंटामुक्त समिती, तहसीलदार व पोलिस ठाण्यातही तक्रार केली आहे. मात्र, त्यांची दखल घेतली जात नाही. अशा पद्धतीने उत्खनन सुरू राहिल्यास घरांना व जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, घरे पडली तर आम्हाला बेघर व्हावे लागणार आहे. म्हणून यातील जबाबदार लोकांना निलंबित करावे, असेही निवेदनात नमूद केले आहे. या वेळी आनंदा गाडे यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune–Satara Highway Stretch Upgraded as Khambatki Ghat Shines Ahead of Visit
Woman Attacked and Dragged Off Road in Satara; Accused Injured by Angry Mob
Illegal Land Allotments to Be Reinvestigated; Relief for Dam Project Victims
Drowning Tragedy in Nira Canal: One युवक Dead, Another Still Untraced
Marathi News Esakal
www.esakal.com