सातारा : 181 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

सिद्धार्थ लाटकर
Monday, 19 October 2020

सातारा जिल्ह्यात एक लाख 71 हजार 511 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 43 हजार 511 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 36 हजार 397 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 430 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पाच हजार 499 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 181  नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. याबराेबरच केवळ 57 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 23, पानमळेवाडी येथील 1, फलटण येथे 20, मायणी येथे 4, पिंपोडा 9 असे एकूण 57 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

 • घेतलेले एकूण नमुने 171511
   
 • एकूण बाधित 43511
   
 • घरी सोडण्यात आलेले -- 36397
   
 • मृत्यू -- 1430
   
 • उपचारार्थ रुग्ण -- 5499

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundred And Eighty One Citizens Recovered From Covid 19 Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: