या अपघाताने खटाव गावात शोककळा पसरली असून, दुदैवी पती-पत्नीला एकाच सरणावर अग्नी देण्यात आला.
वांगी/खटाव : वांगी (ता. कडेगाव) येथील वाल्मीकनगर येथे जुन्या सांगली-सातारा रस्त्यावर दोन मोटारींमध्ये झालेल्या भीषण अपघातात खटाव (जि. सातारा) येथील पती-पत्नी जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. विकास भिकू मोहिते (वय ४२) व पुष्पा विकास मोहिते (३८, रा. राममंदिराजवळ, खटाव, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत.