'तेजस्वीचा ताबा मला द्या अन्यथा स्नेहलला ठार मारतो'; सासूला दिली धमकी

'तेजस्वीचा ताबा मला द्या अन्यथा स्नेहलला ठार मारतो'; सासूला दिली धमकी
Updated on

सातारा : सहा वर्षांच्या बालिकेचा ताबा मिळवण्यासाठी पत्नीचे अपहरण केल्याप्रकरणी पती व त्याच्या मित्रावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा तपासासाठी सातारा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तानाजी गोरे (रा. टेंभुर्णी रोड, कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर) व विठ्ठल माळी (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत स्नेहल तानाजी गोरे, (वय 25, रा. गोरे वस्ती, टेंभुर्णी रोड, कुर्डू, ता. माढा, सध्या रा. विमलविश्व अपार्टमेंट, खेड, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

तानाजीचा पहिला विवाह झाला होता. ही गोष्ट लपवून त्याने स्नेहल यांच्याशी लग्न केले. या दोघांना सहा वर्षांची तेजस्वी नावाची मुलगी आहे. ती स्नेहलच्या आईकडे पुण्यात राहते. तानाजीने फसवणूक केल्याचे लक्षात येताच या दोघांचा घटस्फोटाचा खटला आता न्यायालयात दाखल झालेला आहे. खटला सुरू असतानाच तानाजीला तेजस्वीचा ताबा हवा आहे. त्यासाठी त्याने विठ्ठलच्या मदतीने मंगळवारी (ता. 23) ते गुरुवार (ता. 25) या कालावधीत बॉंबे रेस्टारंट चौकातून स्नेहलला कारमध्ये जबरदस्तीने बसविले. त्यानंतर तिचे हातपाय रस्सीने बांधून पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट असा प्रवास करत कर्नाटक राज्याच्या सीमपर्यंत नेले. त्यानंतर तिच्या आईला फोन करून "तेजस्वीचा ताबा मला द्या अन्यथा स्नेहलला जीवे ठार मारतो,' अशी धमकी दिली होती.

त्यांच्या ताब्यातून सुटल्यानंतर स्नेहलने मोहोळ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी तानाजी व विठ्ठल यांना बोलावून घेतले होते. चौकशीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून तो तपासासाठी शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. उपनिरीक्षक सुहास रोकडे तपास करत आहेत. 

आदेशाचा भंग केल्याने साताऱ्यातील चार हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eknath Shinde Arrives at Dare Village
Mumbai-Pune Highway Traffic News
Sambhar and Fawn Captured on Camera
Karad flyover Pune Bengaluru highway
Marathi News Esakal
www.esakal.com