Satara Crime: जनावरांची बेकायदा वाहतूक; दोघे ताब्यात, दहा गायींची सुटका; आटके टप्पा येथे पोलिसांची कारवाई
Illegal Cattle Transport Busted at Atke Tappa : टेंपोची तपासणी केल्यावर त्यात जर्सी जातीच्या दहा गायी दाटीवाटीने ठेवल्याचे आढळून आले. त्या गायींची चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना क्रूरपणे वागणूक दिल्याप्रकरणी, बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
Atke Tappa: Police rescue 10 cows from illegal transport; two suspects detained on the spot.sakal
कऱ्हाड: जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणारा टेंपो पकडून पोलिसांनी दहा जर्सी जातीच्या गायींची सुटका केली. पुणे- बंगळूर महामार्गावरील नारायणवाडी- आटके टप्पा येथे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही कारवाई झाली.