
सातारा : गोवा बनावटीच्या दारूची ट्रकमधून बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बोरगाव (ता. सातारा) हद्दीत अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ८४ लाख रुपयांची दारू व ट्रक असा सुमारे एक कोटी ९१ हजार ४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.