esakal | गोवा बनावटीची दीड लाखांची दारू जप्त; 'उत्पादन शुल्क'ची धडक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Illegal Liquor

गोवा बनावटीची अवैध दारू घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने सापळा रचून पकडला.

गोवा बनावटीची दीड लाखांची दारू जप्त

sakal_logo
By
सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : गोवा बनावटीची अवैध दारू (Illegal alcohol) घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने (State Excise Department) सापळा रचून पकडला. कऱ्हाड ते ढेबेवाडी रस्त्यावर शिंदेवाडीच्या हद्दीत आज सकाळी ही कारवाई झाली. त्यात पावणेदोन लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. ट्रकसह तब्बल १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकचालक बयाजी तुकाराम साळुंखे (वय ६५, रा. कदमवाडी-कुठरे, ता. पाटण) यास अटक केली आहे. (Illegal Liquor Worth 16 Lakh Seized From State Excise Department Crime News bam92)

उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार शिंदेवाडीत अवैध दारू येणार आहे, अशी माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार कऱ्हाड ते ढेबेवाडी मार्गावरील समर्थ मंगलकार्यालयासमोर त्यांनी सापळा रचला. त्यावेळी त्या सापळ्यात मालट्रक चालक अडकला. ट्रक (क्र. एम. एच.- ४३ यु ५८५९) आला. हा ट्रक संशयास्पद वाटल्याने ट्रकची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची दारू सापडली.

हेही वाचा: प्रतापगड सुरू न झाल्यास टाळे तोडू; आमदार शिंदेंचा गर्भित इशारा

त्यात वेगवेगळ्या कंपनीची तब्बल २१ बॉक्स दारू होती. उत्पादन शुल्कने दारू जप्त केली आहे. त्यासोबत वाहनचालक बयाजी साळुंखे यालाही ताब्यात घेतले आहे. दारूची किंमत एक लाख ६० हजारांच्या आसपास, तर सहाचाकी ट्रकसह अंदाजे १६ लाखांचा मुद्देमाल कारवाईत जप्त झाला आहे. कारवाईत निरीक्षक आर. एस. पाटील, सी. बी. जंगम, आर. एस. माने, भीमराव माळी, व्ही. व्ही. बनसोडे व महिला जवान आर. के. काळोखे यांनी भाग घेतला.

Illegal Liquor Worth 16 Lakh Seized From State Excise Department Crime News bam92

loading image