Kas Pathar : 'कास पठारावरील रस्ता घाटाईमार्गे पळविण्याचा घाट, राजकीय धनिकांनी सर्व शक्ती लावली पणाला!'

कास पठाराला (Kas Pathar) महत्त्व काय आले, नि धनिकांच्या नजरा कास पठारावर खिळल्या गेल्या.
Yavateshwar Ghat Kas Road
Yavateshwar Ghat Kas Roadesakal
Summary

यवतेश्वर ते कास पठार जमिनी बाहेरच्या धनिकांनी बळकाविल्यावर, त्यानंतर राजकीय धनिकांची नजर कास पठारानजीक असलेल्या घाटाई परिसरातील जमिनींवर पडली.

कास : कास पठाराला (Kas Pathar) महत्त्व काय आले, नि धनिकांच्या नजरा कास पठारावर खिळल्या गेल्या. कास पठारला कसं लुटायचं, आपला निजी फायदा कसा करायचा? यासाठी राजकीय धनिकांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. त्यांनी आजूबाजूच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या.

आज यवतेश्वर (Yavateshwar Ghat) ते कास पट्ट्यात बाहेरील धनिकांची हॉटेल दिसतील. त्यांच्या आर्थिक ताकदीसमोर स्थानिक बेजार झालेला आढळतो. त्यामुळे कास पठारावरील रस्ता घाटाईमार्गे पळविण्याचा घाट घातल्याचा आरोप भांबवली पर्यटन (Bhambwali Tourism) प्रमुख रवींद्र मोरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

Yavateshwar Ghat Kas Road
Loksabha Election : '2009 च्या निवडणुकीत झालेली जखम मी अजून विसरलेलो नाही'; संभाजीराजेंचं कोणाला उद्देशून वक्तव्य?

पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की यवतेश्वर ते कास पठार जमिनी बाहेरच्या धनिकांनी बळकाविल्यावर, त्यानंतर राजकीय धनिकांची नजर कास पठारानजीक असलेल्या घाटाई परिसरातील जमिनींवर पडली. राजकीय धनिकांनी या परिसरात मुबलक जमीन खरेदी केली आहे. त्यात महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुद्धा आहेत. या जमिनीचा फायदा उठविण्यासाठी, कास पठार रस्ता बंद केला नसावा ना? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

Yavateshwar Ghat Kas Road
कोकणातील पांडवकालीन टाकेश्वर मंदिराच्या खोदकामात सापडल्या ऐतिहासिक वीरगळ, सतीशीळा; दगडावर कशाची आहे मूर्ती?

स्‍थानिकांच्‍या मागणीकडे काणाडोळा

आजच्या घडीला, घाटाई मार्गावर जमीन खरेदी केलेल्या धनिकांनी अशी काही सेटिंग लावून ठेवली आहे, की घाटाई मार्ग सुरू झाला आहे व कास पठार मार्ग बंद पडला आहे. कास पठार रस्ता हा बामणोली खोऱ्यातील २२ गावांना व भांबवली परिसरातील ९ गावांना सोईचा आहे. बामणोली बोटिंग, शेंबडी मठ, वासोटा ट्रेकिंग, भांबवली वजराई धबधबा येथील पर्यटन हे कास पठार रस्त्यामुळे सोईचे होते. पर्यटन वाढीसाठी व ३१ गावच्या रहदारीसाठी कास पठारावरील रस्ताच उपयुक्त आहे व तेथील स्थानिकांनी तशी मागणी देखील केली आहे; पण त्यांच्या मागणीकडे काणाडोळा केला गेला आहे.

Yavateshwar Ghat Kas Road
साताऱ्यातील वाईत आढळली 13 व्या शतकातील 'गद्धेगळ शिळा'; इतिहासात 'गद्धेगळ'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com