The house burned to ashes : सिलिंडरच्या स्फोटात विंगला घर जळून खाक; सात लाखांचे नुकसान
Karad News : काही वेळातच घरात आग लागल्याने यात संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपड्यांनी पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप घेतले. दरम्यान, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.यात सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले.
कोळे : विंग (ता. कऱ्हाड) येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला. आज सकाळी आठच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले.