तारळीकाठी वैद्यकीय कचरा जाळण्याचा प्रकार

आरोग्याचा गंभीर प्रश्न, अज्ञाताचे कृत्य; कोण आणि कसा अंकुश ठेवणार, असा सवाल
medical waste
medical wastesakal media
Updated on

तारळे : कास परिसरात वैद्यकीय कचरा जाळण्याचा प्रकार ताजा असतानाच येथे असाच प्रकार उघडकीस आला आहे. तारळे- वेखंडवाडी मार्गावरील तारळी नदीकाठी खासगी क्षेत्रात उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आला आहे. यात वापरलेले इंजेक्शन, सुया, सिरिंज, औषधांच्या बाटल्या, गोळ्यांची वेष्टणे, बॉक्स याशिवाय दवाखान्यात वापर होणाऱ्या तत्सम गोष्टींचा समावेश आहे. हा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, आरोग्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

medical waste
पोटनिवडणूक: हिमाचलमध्ये तिन्ही जागा काँग्रेच्या खिशात; भाजपला धक्का

सध्या कोरोनातून सावरत आहोत. त्याचबरोबर व्हायरल आजारांनी डोके वर काढले आहे. अनेकजण याचे शिकार झाले आहेत. अशात उघड्यावर टाकलेला वैद्यकीय कचरा रोगराईला आमंत्रण ठरू नये. हा कचरा तारळे-वेखंडवाडी मार्गावरील पुलानजीक असलेल्या मोकळ्या खासगी जागेत टाकला आहे. यात दवाखान्यात वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. याठिकाणी गुरेढोरे चरत असतात. अशात सुई त्यांच्या पोटात गेल्यास गंभीर स्थिती उद्‌भवू शकते.

medical waste
मोठी बातमी! अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी

तारळ्यातीलच एका दवाखान्यातीलच हा कचरा असल्याचे तेथे असलेल्या काही गोष्टींवरून समजते. मेडिकल संघटनेची बायो वेस्ट टाकण्याची स्वतंत्र नियमावली आहे. त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची पद्धती आहे. परंतु, त्याला बगल देत असे प्रकार घडत असतील तर ही गंभीर बाब आहे. संबंधित क्षेत्रातील सर्वांना याची कल्पना असूनही घडते आहे हे विशेष. यामुळे तारळेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर कोण आणि कसा अंकुश ठेवणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com