कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज; आमदार शिवेंद्रसिंहराजेंची स्पष्ट भूमिका

कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून, प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
Shivenadraraje Bhosale
Shivenadraraje Bhosaleesakal
Updated on

सातारा : कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन धोक्‍यात आले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे काटेकोर पालन प्रत्येकाने करणे आवश्‍यक आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून, प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

परळी (ता. सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वयंम सामाजिक संस्था आणि सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्या वतीने सुरू केलेल्या कोरोना मदत केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सदस्या विद्या देवरे, स्वयंम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनोज विभूते, कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, सरपंच निकम, परळी आरोग्य केंद्राचे डॉ. यादव, कर्मचारी उपस्थित होते.

या कोरोना मदत केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना कोरोना आजाराबद्दल माहिती देणे, कोरोना तपासणीबद्दलचे गैरसमज दूर करणे, बाधित रुग्ण व कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करणे, लसीकरणाबद्दल माहिती देणे व जनजागृती करणे, भागात बेडची उपलब्धता जाणून घेणे आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,"" कोरोना मदत केंद्रामुळे ग्रामस्थांना कोरोनापासून बचावासाठी मार्गदर्शन तर होईलच. पण, बाधित रुग्णांनाही याचा निश्‍चित फायदा होईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनीच काळजी घेणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmer Loss Assessment
Eknath Shinde Announces Crop Damage Panchanamas From October 5
Kas Plateau Flowers 2026
Clash Between Ruling and Opposition Factions at Sahyadri Sugar Factory AGM
Marathi News Esakal
www.esakal.com