esakal | एसपींचा पुढाकार, साताऱ्यात पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल साकार!
sakal

बोलून बातमी शोधा

एसपींचा पुढाकार, साताऱ्यात पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल साकार!

सातारा मेडिकल असोसिएशन मधील एकूण अकरा डॉक्टर्संचा समूह याचे व्यवस्थापन पाहणार असून काही पूर्णवेळ तर काही व्हीसीटिंग फॅकल्टी असणार आहेत. तीन शिफ्टमध्ये काम चालणार आहे. दर पंधरा दिवसांनी बेड उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार असून आढाव्याअंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत.

एसपींचा पुढाकार, साताऱ्यात पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल साकार!

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी अधिकारी कर्मचारी यांनाही होत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पोलिसांसाठी कोविड ऑक्सिजन हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.

या पोलिस कोविड हॉस्पिटलचे उद्‌घाटन आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाले. या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, हायफ्लो ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, साधारण बेड, एक्स रे मशिन, ईसीजी मशीन, कार्डीयाक ॲम्बुलन्स (२४ तास उपलब्ध) आदी सुविधा असणार आहेत. सद्य परिस्थितीमध्ये 35 बेडची क्षमता असून उपलब्ध बेड संख्येपैकी ५० टक्के बेड हे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता राखीव व ५० टक्के बेड हे नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहेत. दर पंधरा दिवसांनी बेड उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार असून आढाव्याअंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. 

बालपण वाचविण्यासाठी धडपणारी चाईल्ड लाइन!

सातारा मेडिकल असोसिएशन मधील एकूण अकरा डॉक्टर्संचा समूह याचे व्यवस्थापन पाहणार असून काही पूर्णवेळ तर काही व्हीसीटिंग फॅकल्टी असणार आहेत. तीन शिफ्टमध्ये काम चालणार आहे. या उद्घाटनप्रसंगी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूर परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण, तसेच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे