
वहागाव (जि. सातारा) : वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथे प्रसूतीसाठी आलेल्या 25 वर्षीय माहेरवाशिनीने नजीकच्या पडीक घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. ज्योती हर्षद देसाई (वय 25, मूळ रा. आरेवाडी, सध्या रा. वनवासमाची) असे आत्महत्या केलेल्या माहेरवाशीण महिलेचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. संबंधित विवाहितेचे चुलत चुलते दादासाहेब शिवाजी निंबाळकर (रा. वनवासमाची) यांनी याबाबत तळबीड पोलिसांत माहिती दिली आहे.
पोलिसांची माहिती अशी, ज्योती देसाई या सहा महिन्यांपूर्वी प्रसूतीसाठी वनवासमाची येथे आल्या होत्या. दरम्यान, रविवारी सायंकाळी घरात कोणी नसल्याचे पाहून देसाई यांनी राहत्या घरानजीकच्या पडीक घरात नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास विवाहितेची शोधाशोध केली असता हा प्रकार नातेवाइकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती तळबीड पोलिसांत दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार देसाई यांची दोन महिन्यांपूर्वी प्रसूती झाली असून, त्यांना दोन महिन्यांची मुलगीही आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.