VIDEO : शरद पवारांनंतर काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या रडारवर; 'आयकर'ने धाडली नोटीस

सचिन शिंदे
Wednesday, 18 November 2020

सत्तेचा  वापर कसा करायचा, तो कोणासाठी करायचा याची भाजपने अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यूव्हरचना केली आहे. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नोटीस दिली होती. आता मला नोटीस आली आहे. मला काही दिवसांची मुदतीत खुलासा करावा. त्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचेही नोटिसीत नमूद केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

कऱ्हाड (जि. सातारा) : दहा वर्षातील संपत्तीचे विवरण द्यावे, अशी आयकर विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिवाळीतच नोटीस बजावली आहे. त्याबाबत श्री. चव्हाण यांनीच पत्रकारांना माहिती दिली.

आमदार चव्हाण म्हणाले, सत्तेचा  वापर कसा करायचा, तो कोणासाठी करायचा याचा भाजपने अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यूव्हरचना केली आहे. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नोटीस दिली होती. आता मला नोटीस आली आहे. मला काही दिवसांची मुदतीत खुलासा करावा. त्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचेही नोटिसीत नमूद आहे. 21 दिवसांत त्याचा खुलासा करायचा आहे. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करत आहोत.

चलो आज आदमी से फरिश्‍ते बन जाये, एक पक्षी की जान बचाएं; पक्षी वाचवाचा 15 गावांत संदेश 

तुमच्यासोबत आणखी कोणाला नोटीस आलीय का, या प्रश्नावर श्री. चव्हाण यांनी मला त्याबाबत काही माहिती नाही, असे स्पष्ट केले. मोदी सरकारवर राज्यातून तुम्हीच टिका करत आहात. म्हणून तुमचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे वाटते काय या प्रश्नावरही श्री. चव्हाण म्हणाले, तसे काही नाही. ही नोटीस येतच असते. मात्र, सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपलाच जमते, हेच निश्चित. 

बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यस्मरण दिनी पाटणात एक लाख शिवसेना सदस्य नोंदणीचा निर्धार

ते म्हणाले, चिराग पासवानच्या नेतृत्वाला भाजपनेच खतपाणी घालून मोठे केले. त्यामुळेच नितीशकुमार यांची कारकीर्द संपविण्याचा घाटच घातला गेला. बिहारच्या निवडणुकीत काॅंग्रेस आघाडीचे काम निराशाजनक झाले. मात्र, नितीशकुमार यांना भाजपने संपविण्याचा कट निश्चित केला. त्यामुळेच पासवान यांनी भाजपच्या नव्हे तर नितीशकुमार यांच्या उमेदवारांविरोधात आपले उमेदवार दिले आहेत. त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट असल्याचेही आमदार चव्हाण यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Income Tax Department Has Issued A Notice To Former Chief Minister Prithviraj Chavan Satara News