धोका वाढला! ढेबेवाडीच्या पोलिस ठाण्यालाही कोरोनाचा विळखा

धोका वाढला! ढेबेवाडीच्या पोलिस ठाण्यालाही कोरोनाचा विळखा
Updated on: 

ढेबेवाडी (जि. सातारा) : परिसरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. कालरात्री ढेबेवाडीसह परिसरातील विविध गावांत कोरोनाचे 15 रुग्ण सापडले. येथील पोलिस ठाण्यातही कोरोनाचा संसर्ग झाला असून, 20 दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 55 वर्षीय पोलिस हवालदारांचा काल रात्री कऱ्हाड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पाच महिन्यांपासून रस्त्यावर असलेले कोरोना योद्धेही असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. 

ढेबेवाडीसह परिसरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दोनशेच्या घरात निघाला आहे. त्यामध्ये स्थानिक व्यावसायिक, मुंबईकर, ज्येष्ठ नागरिक, पोलिस, होमगार्ड, पोलिस पाटील आदींचा समावेश आहे. काल रात्री येथील पोलिस ठाण्यातील एका हवालदाराचा कऱ्हाड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्याकडे न्यायालयीन ड्युटी होती. मनमिळाऊ, शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. दरम्यान, येथील पोलिस ठाण्यातील एकूण पाच कर्मचारी व होमगार्ड यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यापासून येथील पोलिस कर्मचारी, होमगार्ड, पोलिस पाटील, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका- सहायिका आणि काही ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी आदी घटक रस्त्यावर उतरून सेवा बजावत आहेत. ठिकठिकाणी पोलिसांनी सुरू केलेले चेकनाके लॉकडाउन शिथिल झाल्यानंतरही सुरूच ठेवण्यात आले आहेत. एकूणच वाढत्या रुग्णांबरोबरच योद्‌ध्यांवरील ताणही येथे वाढत चालल्याचे चित्र आहे. 

काल रात्री या परिसरात 15 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. ढेबेवाडीतील 3, गुढे 5, साबळेवाडी 3, धुमाळवाडी 3 आणि मोरेवाडीतील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. दरम्यान, येथील पोलिस ठाण्यात 32 कर्मचारी कार्यरत आहेत. खबरदारी म्हणून पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीही केली जात आहे. त्यामध्ये पाच कर्मचारी व एक होमगार्ड बाधित आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यात जंतुनाशकाची नियमितपणे फवारणी केली जात आहे. तक्रार अर्ज घेऊन येणाऱ्यांना अर्ज जमा करण्यासाठी पेटी ठेवली असून, दोरी आडवी लावून परिसर प्रतिबंधित केला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Neera River Water Release Meeting and Protest Updat
Tapola tourism during Diwali holidays 2026
Eknath Shinde farmers phone conversation
Sonia Farande success story